‘प्रलयानंतरची तळटीप’ : या कवितारूपी तळटीपांना प्रलयंकारी अनुभवांची / घटनांची स्पष्ट पार्श्वभूमी आहे
आपण भवतालाला, अस्तित्वात असलेल्या परंपरागत व्यवस्थांना पेलता येणार नाहीत, सुसह्य होऊ शकणार नाहीत, असे ‘निरागस’ अनुभव आपल्या कवितांमधून व्यक्त करत आहोत, याची जाणीवदेखील कवयित्रीला आहे. ही जाणीव कोणत्याही कवीला / कवयित्रीला आपल्या निर्मितीविषयी आवश्यक असणाऱ्या आत्मविश्वासाच्या जाणिवेशी नाते प्रस्थापित करणारी आहे. अनुभवांची अशी सघनता आणि व्यामिश्रता कवयित्रीच्या समृद्ध अनुभवविश्वाची निदर्शकच मानावयास हवी.......